जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रात आलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी गौप्यस्फोट केला. शिवसेनेचे ज्येष्ठ मंत्री एकनाथ शिंदे हे फक्त सहीपुरते उरले असून ते मार्ग शोधत असल्याचं सूचक विधान नारायण राणेंनी केलंय. ते वसई-विरारमध्ये नालासोपारा इथे आयोजित जन आशीर्वाद यात्रेत बोलत होते. नारायण राणेंच्या याच विधानावर एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिलं. राणेंचं हे विधान निव्वळ संभ्रम पसरवण्यासाठी असल्याचा दावा एकनाथ शिंदेंनी केला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
