अमरावती येथे राजस्थानी हितकारक महिला मंडळाने रविवारी 26 डिसेंबर 2021 ला धावण्याची स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनीही सहभाग घेतला. साडीचा पदर खोचून नवनीत राणा धावल्या. आणि स्पर्धेत अव्वल आल्या. यावेळी त्यांचं खूप कौतूक झालं. महिलांनी शारीरिक आणि मानसिक दृष्टीने सक्षम राहण्यासाठी वेळातून वेळ काढून व्यायाम करावा. स्वतःला सुदृढ ठेवावं, असं आवाहन त्यांनी केलं. राजस्थानी हितकारक महिला मंडळाने आयोजित केलेल्या या उपक्रमाचे कौतुक केलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
