राज्यात दंगल भडकवण्याचं भाजप नेत्यांनी षडयंत्र रचल्याचा स्फोटक आरोप करणारे राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजप आमदार आशीष शेलार यांच्यावर निशाणा साधला आहे. पत्रकार परिषदेत शेलार हे रझा अकादमीच्या नेत्यांना त्यांच्या कार्यालयात कशासाठी भेटले असा सवाल उपस्थित करताना त्यांनी आशीष शेलार आणि रझा अकादमीच्या नेत्यांच्या भेटीचा फोटो पत्रकारांना दाखवला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
