मुंबई तक नवाब मलिकांनी अमृता फडणवीस यांच्या गाण्याला फायनान्स देणाऱ्या जयदीप राणा वरुन देवेंद्र फडणवीस यांचे ड्रग पेडलरशी संबंध आहेत का असा सवाल केला होता. त्यावेळी दिवाळीनंतर फडणवीस यांनी ‘बॉम्बस्फोट’ करण्याचा इशारा दिला होता. नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी असलेले संबंध उघड करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. 9 नोव्हेंबर ला फडणवीसांनी मुंबई बॉम्बस्फोटातल्या व्यक्तीकडून मलिकांनी प्रॉपर्टी विकत घेतल्याचा आणि त्यानुषंगाने त्यांचा अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप केला होता. ती नवाब मलिकांची ही गोवावाला कम्पाउंड मधली प्रॉपर्टी ही आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
