राणेंचा दावा, शिवसेना सोडणाऱ्यांत रामदास कदमांचं नाव यादीत 1 नंबरवर, पण…

माजी खासदार आणि भाजपचे नेते निलेश राणे यांनी अजित पवार आणि त्यांच्या नातेवाईकांवर पडलेल्या आयकर धाडीचं समर्थन करत पवार कुटुंबावर हल्ला चढवला. ‘लफडी केली म्हणून यंत्रणा मागे लागल्या. पवार आणि त्यांच्या आजूबाजूचे महाराष्ट्रात फिरायच्या लायकीचे नसून सगळे तुरुंगात गेले पाहिजे’, असं टीकास्त्र निलेश राणे यांनी अजित पवारांवर डागलं. निलेश राणे यांनी रत्नागिरीत माध्यमांशी संवाद साधला. […]

मुंबई तक

21 Oct 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:34 PM)

follow google news

माजी खासदार आणि भाजपचे नेते निलेश राणे यांनी अजित पवार आणि त्यांच्या नातेवाईकांवर पडलेल्या आयकर धाडीचं समर्थन करत पवार कुटुंबावर हल्ला चढवला. ‘लफडी केली म्हणून यंत्रणा मागे लागल्या. पवार आणि त्यांच्या आजूबाजूचे महाराष्ट्रात फिरायच्या लायकीचे नसून सगळे तुरुंगात गेले पाहिजे’, असं टीकास्त्र निलेश राणे यांनी अजित पवारांवर डागलं. निलेश राणे यांनी रत्नागिरीत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी रामदास कदम यांची शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये जाणाऱ्यांत पहिला नंबर होता, असा दावाही केला. नारायण राणे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, तेव्हा यादीत कदमांचंही नाव असल्याच्या निलेश राणेंच्या दाव्यानं खळबळ उडालीय.

    follow whatsapp