पुणे: ओबीसी आंदोलनकर्ते लक्ष्मण हाके यांच्यावर मराठा आंदोलकांनी दारू पिण्याचे आरोप केले आहेत. या संदर्भात पुण्यातील कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सध्या हाकेंचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये हाकेंनी मद्यपान केल्याचे दिसत आहे. त्यामुळे या प्रकरणावरून पुण्यातील राजकीय वातावरण तापले आहे. हाके हे ओबीसी समाजाचे लोकप्रिय नेते आहेत आणि त्यांच्या या प्रकरणामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
