संजय राठोड यांच्या राजीनाम्याप्रकरणी संजय राऊत, दरेकर म्हणतात..

बीड जिल्ह्यातील परळी येथील २२ वर्षाच्या पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यात आत्महत्या केली होती. पूजाच्या आत्महत्येची चर्चा सुरू झाल्यानंतर राठोड यांचं नाव या प्रकरणात समोर आलं होतं. त्यानंतर संजय राठोड यांच्या राजीनाम्याच्या वृत्तावर आता शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत, गुलाबराव पाटील आणि विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनीही आपली भूमिका मांडली आहे. माध्यमांशी बोलताना राऊत […]

मुंबई तक

16 Feb 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:46 PM)

follow google news

बीड जिल्ह्यातील परळी येथील २२ वर्षाच्या पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यात आत्महत्या केली होती. पूजाच्या आत्महत्येची चर्चा सुरू झाल्यानंतर राठोड यांचं नाव या प्रकरणात समोर आलं होतं. त्यानंतर संजय राठोड यांच्या राजीनाम्याच्या वृत्तावर आता शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत, गुलाबराव पाटील आणि विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनीही आपली भूमिका मांडली आहे. माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले की, हा विषय सरकारचा आहे आणि सरकारचे प्रमुख लोक त्यासंबंधात त्यांचं मत व्यक्त करतील किंवा निर्णय घेतील. तसेच संजय राठोड हे शिवसेनेचे प्रमुख मंत्री आहेत. शिवसेनेचा चेहरा आहेत. त्यांच्यावर जे आरोप केले जात आहेत, त्याप्रकरणी पोलीस तपासाचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. मात्र राजीनाम्याबद्दल त्यांनी आपल्याला माहित नसल्याचं सांगितलं. तर विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी सरकार हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हटलं आहे. तर याप्रकरणी योग्य तोच निर्णय घेतला जाईल अस विश्वास गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला आहे.

    follow whatsapp