परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न! नेमकं कारण काय?

परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात ज्ञानोबा वावळे यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला.

मुंबई तक

18 Sep 2024 (अपडेटेड: 18 Sep 2024, 06:52 PM)

follow google news

Parbhani Collector Office : परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात घडलेल्या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण कार्यालयात खळबळ उडाली आहे. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य ज्ञानोबा वावळे यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मते, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकांमधील निर्णय आणि कामाची माहिती त्यांना दिली जात नव्हती. त्यांनी असा आरोप केला की, आपले सुचवलेले काम निधीमधून मंजूर करण्यात आले नाही, तसेच जिल्हाधिकारी यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. या प्रसंगामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात बराच वेळ गोंधळ निर्माण झाला होता. सुदैवाने, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

    follow whatsapp