Medha Kulkarni यांनी Rajya Sabha मध्ये केली 'ही' मागणी

शनिवारवाड्याचे पुनरूज्जीवन करण्यासाठी राज्यसभेत निधीची मागणी सादर केली गेली. मेधा कुलकर्णी यांनी हा मुद्दा मांडला आहे.

मुंबई तक

30 Jul 2024 (अपडेटेड: 30 Jul 2024, 03:00 PM)

follow google news

आज राज्यसभेच्या सत्रात पुण्याची ऐतिहासिक ओळख असलेल्या आणि एकेकाळी संपूर्ण देशाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्याच्या पुनःरूज्जीवनचा मुद्दा उपस्थित केला. शनिवारवाड्याच्या दुरुस्तीचे व देखभालीचे काम लवकरात लवकर सुरु व्हावे आणि यासाठी विशेष निधीची तरतूद करावी, जेणेकरून हे काम लवकर पूर्ण व्हावे,' अशी मागणी मेधा कुलकर्णी यांनी केली. शनिवारवाड्याची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्ता लक्षात घेता या महत्वाच्या ऐतिहासिक वास्तूचे पुनरुद्धार आणि देखभाल करणे गरजेचे मानले जात आहे. अनेक नागरिक आणि पर्यटक या स्थळाला भेट देतात, ज्यामुळे त्या आसपास असलेल्या व्यापारी आणि पर्यटन उद्योगालाही चालना मिळते. केंद्र सरकारकडून विशेष निधी मिळाल्यास हे कार्य जलद गतीने पूर्ण होऊ शकते असेही कुलकर्णी यांनी स्पष्ट केले. राज्यसभेत ही मागणी सादर केल्यानंतर अनेक सदस्यांनी या मुद्द्याचे समर्थन केले आणि लवकरच हा प्रश्न समाधानी मार्गाने सोडवला जाईल अशी आशा व्यक्त केली आहे.

    follow whatsapp