Maratha Reservation : राज ठाकरेंचा शरद पवारांना सवाल, शिंदेंसोबतच्या भेटीवरून घेरलं

Raj Thackeray on Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीवेळी राज ठाकरेंनी शरद पवार-एकनाथ शिंदे भेटीवर बोट ठेवत एक प्रश्न उपस्थित केला.

मुंबई तक

06 Aug 2024 (अपडेटेड: 06 Aug 2024, 01:30 PM)

follow google news

Raj Thackeray Video : राज ठाकरे महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. वेगवेगळ्या भागात ते फिरत असून, मराठवाड्यात गेल्यानंतर त्यांना मराठा आरक्षण आंदोलकांचाही सामना करावा लागला. 

सोलापूरमध्ये असताना राज ठाकरे यांनी महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही, असे विधान केले होते. त्यावरून मराठा आरक्षण आंदोलकांनी राज ठाकरेंविरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर राज ठाकरे यांनी या आंदोलकांशी चर्चा केली आणि आरक्षणाचा मुद्दा, त्यातील अडथळे याबद्दल भूमिका मांडली. 

याच भेटीदरम्यान, राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्या भेटीचा मुद्दाही उपस्थित केला. केंद्र सरकारकडून कार्यवाही करण्याची गरज असल्याचा मुद्दा मांडत राज ठाकरेंनी शरद पवारांना सवाल केला. राज ठाकरे काय म्हणालेत, पहा व्हिडीओ...

    follow whatsapp