राज ठाकरेंचा पाकिस्तानी सिनेम्याला विरोध, सरकारला थेट इशारा!

फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा भारतात लवकरच प्रदर्शित होणार आहे, मात्र राज ठाकरेंनी सरकारला इशारा दिला आहे कि महाराष्ट्रात हा सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही.

मुंबई तक

23 Sep 2024 (अपडेटेड: 23 Sep 2024, 08:38 AM)

follow google news

पाकिस्तानी अभिनेता फवाद खान याचा 'लिजेंड ऑफ मौला जट' नावाचा सिनेमा लवकरच भारतात प्रदर्शित होणार आहे. मात्र, पाकिस्तानी अभिनेत्याचा हा सिनेमा महाराष्ट्रात कुठल्याही परिस्थितीत प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा मनसेने दिला आहे. राज ठाकरे यांनी थेट सरकारला आवाहन केले आहे की त्यांनी या चित्रपटावर बंदी आणावी. आपल्या वक्तव्यात, त्यांनी या चित्रपटावरील आपला विरोध स्पष्ट केला आहे आणि महाराष्ट्रात कोणत्याही पाकिस्तानी कलाकाराचा चित्रपट प्रदर्शित न होण्याची खात्री करण्यासाठी आपली भूमिका ठाम ठेवली आहे. राज ठाकरेंच्या या इशाऱ्यानंतर आता चित्रपटाच्या प्रदर्शानाबाबत काय निर्णय घेतला जाईल, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

    follow whatsapp