गेल्या दोन दिवसात राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत 5 पटीने वाढ झाली आहे. रविवारच्या दिवशी राज्यात तब्बल 4092 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्यातील कोरोना संख्या 600 ने वाढली आहे. काल हा आकडा चार हजारावर पोहोचला होता. राज्यात कोरोना वाढत आहे. विदर्भ आणि मुंबईत आकडे वाढत आहेत, असं राजेश टोपे म्हणाले. मात्र त्यामुळे मुंबई लोकल बंद करण्याचा, लॉकडाऊनचा निर्णय तातडीने घेतला जाण्याची शक्यता कमी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
