मनोज जरंगेंसमोर राजरत्न आंबेडकर का ढसाढसा रडले?

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांनी आज जालन्याच्या अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावेळी आंबेकर यांनी जरांगे यांच्या तब्येतीची विचारपूस केली.

मुंबई तक

20 Sep 2024 (अपडेटेड: 20 Sep 2024, 08:44 AM)

follow google news

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांनी आज जालन्याच्या अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावेळी आंबेकर यांनी जरांगे यांच्या तब्येतीची विचारपूस केली. आज मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा तिसरा दिवस असून जरांगे यांची प्रकृती मिनिटं-मिनिटं खालावत आहे असे राजरत्न आंबेडकर म्हणाले. आम्ही तुमच्यासाठी फक्त मत देणारे साधन आहोत का असा सवाल राजरत्न आंबेडकर यांनी शासनाला केला. आम्हाला किती दिवस मत देणारे साधन म्हणून वापरणार आहात असा प्रश्न करत आम्हाला त्या शासनात आमची लोकं बघू द्या, न्याय द्या अशी मागणी राजरत्न आंबेडकर यांनी केली. जर मनोज जरांगेंच्या केसालाही धक्का लागला तर येणाऱ्या निवडणुकीत सत्ताधारी किंवा विरोधक, दोन्ही पक्षांना प्रचारासाठी उतरू देणार नाही अशी परिस्थिती तयार करू असा इशारा राजरत्न आंबेडकर यांनी दिला.

    follow whatsapp