मुंबई तक राज्याच्या राजकारणात सत्ता संघर्ष सुरू होता. तेव्हा राज्याच्या राजकारणातले काही महत्त्वाच्या नेत्यांचे फोन टॅप झाले होते. ही खळबळजनक माहिती समोर आली आणि विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या. या प्रकरणात आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांचं नाव समोर आलं. त्यानंतर त्यांच्यावर दोन गुन्हे दाखल झाले. त्यापैकी कुलाबा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात 750 पानांच्या चार्जशीटमध्ये शुक्ला यांच्याविरोधात खळबळजनक साक्षी नोंदवल्या आहेत
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
