उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या घराबाहेर उभ्या असलेल्या कारमध्ये स्फोटके सापडल्यावर त्यात सचिन वाझे आणि परमबीर सिंग यांची नावं समोर आली. या प्रकरणाने अवघ्या महाराष्ट्रात खळबळ माजली. पण आता या प्रकरणाला एक वेगळं वळण मिळणार का असा प्रश्न निर्माण झालाय. कारण या प्रकरणी न्यायमूर्ती के. यू. चांदीवाल आयोगाने राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना नोटीस बजावलीय.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
