अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन जोरात सुरु आहे. मराठा आंदोलकांची तसेच ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची या आंदोलनावर लक्ष आहे. आज संभाजीराजे छत्रपती यांनी अंतरवाली सराटीत भेट दिली आणि जरांगे यांची भेट घेतली. त्यांनी सरकार आणि विरोधकांवर जोरदार टीका केली. मात्र, संभाजीराजे यांनी ओबीसी आंदोलनाला भेट न दिल्याने हाके आणि वाघमारे यांनी त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली आणि टीकास्त्र सोडलं. या भेटीमुळे मराठा आणि ओबीसी आंदोलकांमध्ये सुरू असलेल्या संघर्षात कुठल्या नव्या घटना घडतील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
