अकलुजमधील रॅलीत शरद पवार, सुशीलकुमार शिंदे यांचं भाषण

अकलुजमध्ये महाविकास आघाडीनं नेत्यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन केलं. शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदेंनी भाषणाद्वारे एकजूट दाखवली.

मुंबई तक

30 Sep 2024 (अपडेटेड: 30 Sep 2024, 08:18 AM)

follow google news

सोलापुरातील अकलुजमध्ये महाविकास आघाडीनं दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन केलं. शरद पवार, सुशीलकुमार शिंदे आणि विजयसिंह मोहिते पाटील, बाळासाहेब थोरात, शाहू महाराज एकाच व्यासपीठावर आले होते. त्यावेळी शरद पवार भाषणाला उठत असताना सुशीलकुमार शिंदेंनी तुम्ही शेवटी भाषण करा अशी विनंती केली. त्यावर मी तुमच्यापेक्षा साडेआठ महिन्यांनी लहान आहे, माझ्या नादी लागू नका म्हणत फटकेबाजी केली. सुशीलकुमार शिंदे सत्कारमुर्ती असल्यानं शरद पवार यांनी आधीच भाषण केलं. महाविकास आघाडीनं या व्यासपीठावर एकजूट दाखवत, आगामी निवडणुकांसाठी आपली शक्ती प्रकट केली.

    follow whatsapp