मुंबई तक शरद पवार यांनी आत्तापर्यंत केलेल्या भाषणांचं संकलन करून ‘नेमकेची बोलणे’ या पुस्तकाचं प्रकाशन आज मुंबईत करण्यात आलं. या कार्यक्रमाला विजय केळकर, रंगनाथ पाठारे, शिवसेना खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार या सगळ्यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात संजय राऊत यांनी भाषणाला उभं राहिलेले असतानाच आज तुमच्या विचारांनाच आम्ही भगवं कव्हर घातलंय असं म्हटलं ज्यामुळे एकच हशा पिकला. अत्यंत खुमासदार शैलीत संजय राऊत यांनी भाषण केलं. तसंच भाजपवर पक्षावरही निशाणा साधला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
