Sharad Pawar : ''नव्या पिढीसमोर खोटा इतिहास...', शिवरायांच्या सुरत लुटीवर पवारांनी फडणवीसांना सुनावलं

मालवणमध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कोसळल्यानंतर मविआने आंदोलन केले. फडणवीसांच्या वक्तव्यावर शरद पवारांनी तीव्र निषेध व्यक्त करत योग्य पार्श्वभूमीवर इतिहासाचा अभ्यास होणे आवश्यक असल्याचे सांगितले.

मुंबई तक

04 Sep 2024 (अपडेटेड: 04 Sep 2024, 02:58 PM)

follow google news

Sharad Pawar on Devendra Fadnavis : मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळ्यानंतर मविआकडून त्याविरोधात मुंबईत आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात मविआचे सर्वच नेते सहभागी झाले होते. या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस यांनी शिवरायांच्या सूरत लुटीविषयी भाष्य केलं होतं. त्यावरच आता शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवारांनी फडणवीसांच्या या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे आणि या विधानाचा तीव्र निषेध केला आहे. त्यांच्या मते, इतिहासाची यथोचित चर्चा आणि अभ्यास करून प्रतिक्रिया देणे आवश्यक आहे. इतिहासातल्या घटनांचे संदर्भ योग्य पद्धतीने मांडले जावेत, असेही पवार म्हणाले. महाराजांच्या सूरत लुटीच्या इतिहासाचा योग्य त्या पार्श्वभूमीवर अभ्यास व्हावा आणि योग्य त्या पद्धतीने या घटनांचा उल्लेख व्हावा, अशी शरद पवारांची अपेक्षा आहे.

    follow whatsapp