भारताचा 2007 च्या दरम्यान इंग्लंडचा दौरा होता. त्यावेळी आपल्या संघाचा कर्णधार राहुल द्रविड होता.मात्र बॅटिंग परिणाम होत असल्याने कर्णधार पद सोडण्याचा निर्णय घेतला आणि हे पद सचिन देखील घेण्यास तयार नव्हता.मात्र त्यावेळी सचिनने महेंद्रसिंग धोनीचे नाव सुचविले आणि त्याच्या सांगण्या वरून धोनीला कर्णधार केल्याचे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगितले. एजल फेडरल लाईफ इन्श्युरन्स कंपनीच्या वतीने पद्मभूषण चंदू बोर्डे यांचा विशेष सत्कार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी शरद पवार हे बोलत होते.तर त्या दरम्यान शरद पवार यांनी क्रिकेट क्षेत्रातील अनेक आठवणींना उजाळा देखील दिला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
