शशिकांत शिंदे म्हणाले, BJPचं माझ्यावर खूप प्रेम, मला 100 कोटींची ऑफर

राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार शशिकांत शिंदे यांनी भाजपबद्दल मोठा गौप्यस्फोट केलं. राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये येण्यासाठी आपल्याला १०० कोटी रुपयांची ऑफर होती, असा दावा शशिकांत शिंदे यांनी केला. सातारा जिल्ह्यातील एका शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी किरीट सोमय्या यांच्याबद्दलही भाष्य केलं. ‘किरीट सोमय्या आले होते. मी अजित पवार यांना सांगितलं होतं मला परवानगी […]

मुंबई तक

20 Oct 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:34 PM)

follow google news

राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार शशिकांत शिंदे यांनी भाजपबद्दल मोठा गौप्यस्फोट केलं. राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये येण्यासाठी आपल्याला १०० कोटी रुपयांची ऑफर होती, असा दावा शशिकांत शिंदे यांनी केला. सातारा जिल्ह्यातील एका शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी किरीट सोमय्या यांच्याबद्दलही भाष्य केलं. ‘किरीट सोमय्या आले होते. मी अजित पवार यांना सांगितलं होतं मला परवानगी द्या. त्यांचा एकदा तोतरेपणा बाहेर काढतो की नाही बघा, पण अजित पवार यांनी मला नको म्हणून सांगितलं,’ असं म्हणत शशिकांत शिंदे सोमय्यांवर घसरले.

    follow whatsapp