फडणवीस, शिंदे समर्थकांत श्रेयवादाची लढाई का तापली? पोस्टर्स, जाहिरातींची चर्चा

एन्काऊंटरनंतर शिवसेनेसह भाजप कार्यकर्त्यांनी बदलापुरात सेलिब्रेशन केला आहे.

मुंबई तक

26 Sep 2024 (अपडेटेड: 26 Sep 2024, 07:55 AM)

follow google news

एन्काऊंटर झाल्याच्या काही तासांतच शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते थेट बदलापूर रेल्वे स्थानकावर पोहचले. जिथे लोकांचा जनक्षोभ उसळला होता, तिथेच शिवसैनिकांनी पेढे वाटून आनंद साजरा केला. 'एकनाथ, एक न्याय, बलात्काराला थारा नाय', अशा आशयाचे पोस्टर्सही यावेळी झळकावण्यात आले. आता शिंदेच्या कार्यकर्त्यांनी सेलिब्रेशन केलं मग भाजपचे कार्यकर्ते कसे मागे राहतील? 'बदला पूरा' अशा कॅप्शनने भाजपनेही पोस्टर्स शेयर केले, ज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हातात पिस्तूल असल्याचं दिसून येतंय. याशिवाय या कारवाईवरून भाजपने उद्धव ठाकरेंनाही डिवचण्याचा प्रयत्न केल्याचं पाहायला मिळालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाकडून थेट 'सकाळ' वृत्तपत्रावर पानभर जाहिरात दिलीय. 'असा हवा धर्मवीर, शिवशाही परत आली', असं कॅप्शन देत मुख्यमंत्र्यांचा फोटो त्यावर लावण्यात आलंय.

    follow whatsapp