काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक का सहभागी झाले?

काँग्रेसनं कन्याकुमारी ते काश्मीर अशी भारत जोडो यात्रा काढलीये. काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ही यात्रा सुरू आहे. तामिळनाडू, केरळनंतर आता यात्रा कर्नाटकमध्ये पोहोचलीये. महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर ही यात्रा असून, लवकरच महाराष्ट्रात दाखल होणार आहे. देशपातळीवरच्या या यात्रेसोबतच आता राज्याराज्यांमध्येही भारत जोडो यात्रा काढल्या जाणार आहेत. मुंबईतही काँग्रेसनं भारत जोडो यात्रा काढली. […]

मुंबई तक

02 Oct 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 07:58 PM)

follow google news

काँग्रेसनं कन्याकुमारी ते काश्मीर अशी भारत जोडो यात्रा काढलीये. काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ही यात्रा सुरू आहे. तामिळनाडू, केरळनंतर आता यात्रा कर्नाटकमध्ये पोहोचलीये. महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर ही यात्रा असून, लवकरच महाराष्ट्रात दाखल होणार आहे. देशपातळीवरच्या या यात्रेसोबतच आता राज्याराज्यांमध्येही भारत जोडो यात्रा काढल्या जाणार आहेत. मुंबईतही काँग्रेसनं भारत जोडो यात्रा काढली. या यात्रेत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, डावे पक्ष, समाजवादी पार्टी यांनी सहभागी होत पाठिंबा दिलाय. शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत यांनी सहभाग घेतला. यात्रेत सहभागी होण्याच्या कारणाचा खुलासा सावंतांनी केलाय?

    follow whatsapp