Uddhav Thackeray : तुम्ही माझा बाप चोरु शकता पण हिंमत नाही; समोर या मग दाखवतो…

नागपूर : ज्याला काही कमाई करण्याची लायकी नाही ते सगळं चोरतात, म्हणजे शिवसैनिकांच्या मेहनतीवर निवडून आले आणि पलिकडे गेले. बर जाताना गेले ते गेले, मी म्हणतो माझे वडील चोरतात, पक्षाचा धनुष्यबाण चोरतात. हरकत नाही, तुम्ही बाकी सगळं चोरु शकता, पण हिंमत नाही चोरु शकत, असं म्हणतं शिवसेना पुन्हा उभी करण्याचा विश्वास (ठाकरे गट) पक्ष प्रमुख […]

मुंबई तक

27 Dec 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:56 PM)

follow google news

नागपूर : ज्याला काही कमाई करण्याची लायकी नाही ते सगळं चोरतात, म्हणजे शिवसैनिकांच्या मेहनतीवर निवडून आले आणि पलिकडे गेले. बर जाताना गेले ते गेले, मी म्हणतो माझे वडील चोरतात, पक्षाचा धनुष्यबाण चोरतात. हरकत नाही, तुम्ही बाकी सगळं चोरु शकता, पण हिंमत नाही चोरु शकत, असं म्हणतं शिवसेना पुन्हा उभी करण्याचा विश्वास (ठाकरे गट) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखविला.

उद्धव ठाकरे नागपूरमधील शिवसेना (ठाकरे गट) पदाधिकरी मेळाव्यात बोलत होते. यावेळी ते म्हणाले, तुम्ही काय केलं ते आता नाही कळणार, सामन्याला समोर या मग दाखवतो, खरं काय अन् खोट काय ते. शिवसेना महाराष्ट्राची अस्मिता आहे ती संपवायला निघाले आहेत. शिवसेना विचार आहे तो संपणार नाही, असाही निर्धार त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

    follow whatsapp