सोयाबीनचं पिक शेतात उभं असताना सोयाबीनचा भाव 11 हजार प्रती क्विंटल होता. सोयाबीन मार्केटमध्ये यायची वेळ आली आणि सोयाबीनचे भाव थेट साडेतीन हजार ते सहा हजारांवर गडगडले.
ADVERTISEMENT
हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी जनार्धन मते यांच्याकडे वडिलोपार्जित ८ एकर शेती आहे. यावर्षी सोयाबीनची मागणी आणि वधारलेला भाव पाहून त्यांनी ८ एकर शेतीत सोयाबीन पेरल होत.
मात्र ऐन काढणीच्यावेळी आता सोयाबीनचे भाव खाली आल्याने मते यांच्यासारख्या हजारो शेतकऱ्यांना चिंता सतावू लागली आहे.
केंद्र सरकारने सोयाबीन आयात करण्यास परवानगी दिल्याने हे झाल्याचा आरोप शेतकरी करतायत.
पण या सगळ्यात मरण होतंय ते कोरडवाहू शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे हिंगोली जिल्ह्यातील अशाच एका शेतकऱ्याची ही व्यथा…
पाहा हा व्हीडिओ
ADVERTISEMENT
