माजी आमदार आणि भाजपचे नेते बापूसाहेब पठारे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. पुण्यातील वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील तीन माजी नगरसेवक तसेच मुलगा सुरेंद्र पठारे यांच्यासह बापूसाहेब पठारेंनी शरद पवारांच्या तुतारी चिन्हावर निवडणूक लढण्याचा निश्चय केला. त्यामुळे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे आणि भाजपचे नेते, माजी आमदार जगदीश मुळीक यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. वडगावशेरी मतदारसंघात आघाडीच्या उमेदवारांना जोरदार लढत देण्याची तयारी त्यांनी केली आहे. त्यामुळे या मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
