हे आहेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ज्यांना बुलडोजर बाबा म्हणूनही ओळखलं जातं. दुसरीकडे ठाणे आणि मीरा भाईंदर शहरात अनधिकृत हुक्का पार्लर, पब आणि बारवर कारवाई झाल्यानंतर ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाचं कौतुक करणारे पोस्टर लागले होते ज्यावर 'महाराष्ट्राचा बुलडोझर बाबा' असा मजकूर होता. शिंदेंचेच आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाचं कौतुक करणारे हे पोस्टर लावले होते. परंतु या बुलडोजर कारवायांवर सर्वोच्च न्यायालयाने फटकारलंय आणि कारवाई करणाऱ्यांचे कान पिळलेत. काय म्हणालंय सुप्रीम कोर्टा, आजच्या व्हीडिओमध्ये समजून घेऊयात.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
