पवारांचं पंतप्रधानपद का हुकलं? सुशीलकुमार शिंदेंचा गौप्यस्फोट

शरद पवारांचे पंतप्रधानपद का हुकले, हे सुशीलकुमार शिंदेंनी उघड केले.

मुंबई तक

30 Sep 2024 (अपडेटेड: 30 Sep 2024, 08:17 AM)

follow google news

सुशीलकुमार शिंदेंनी शरद पवारांचं पंतप्रधान पद का हुकलं याबाबत गौप्यस्फोट केलाय. शरद पवार दिल्लीतून महाराष्ट्रात आले नसते तर पीएम झाले असते. पी.व्ही. नरसिंहराव यांच्यासोबत माझं बोलणं झालं होतं. शरद पवारांनी महाराष्ट्रात येण्याचा निर्णय घेतला नसता तर शरद पवारांची पंतप्रधानपदाची संधी हुकली नसती. असा दावा सुशीलकुमार शिंदेंनी केलाय. सोलापुरातील अकलुजमध्ये महाविकास आघाडीनं दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन केलं. शरद पवार, सुशीलकुमार शिंदे आणि विजयसिंह मोहिते पाटील, बाळासाहेब थोरात, शाहू महाराज एकाच व्यासपीठावर आले होते. यावेळी भाषणात बोलताना सुशीलकुमार शिंदेंनी अनेक मोठ्या घटना सांगत गौप्यस्फोट केला. सुशीलकुमार शिंदेंच्या विधानांनुसार, महाराष्ट्रातील राजकारणामुळे शरद पवारांची पंतप्रधान होण्याची संधी हुकली. त्यांनी महाराष्ट्रात येण्याचा निर्णय घेतला नसता तर इतिहास वेगळा असू शकला असता. महाविकास आघाडीच्या सभेत या वक्तव्यामुळे अनेकांना धक्का बसला आणि राजकीय वर्तुळात उलथापालथ झाली आहे. अशा अनेक चर्चांचा ओघ सुरु आहे आणि यामुळे पुन्हा एकदा पवारांच्या राजकीय निर्णयांचा अभ्यास करण्याचा मुद्दा समोर आला आहे.

    follow whatsapp