अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवरून सुषमा अंधारेंनी म्हस्केंची काढली लायकी

बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे एन्काऊंटरवरुन सुषमा अंधारे यांनी नरेश म्हस्के यांची चांगलीच लायकी काढली आहे.

मुंबई तक

24 Sep 2024 (अपडेटेड: 24 Sep 2024, 08:35 AM)

follow google news

बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याने स्वत:वर गोळी झाडून घेतल्याची बातमी समोर आली आहे. या गोळीबारात अक्षय शिंदेचा मृत्यू झाला असून एक पोलीस जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. आज पहाटे ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. अक्षयने पोलिसांची बंदूक हिसकावून घेऊन हा प्रकार केल्याचं सांगितलं जात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच त्याचा एन्काऊंटर केल्याने अक्षयचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. ही घटना ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. आता या प्रकरणावरुन सुषमा अंधारे व नरेश म्हस्के यांच्यात चांगलीच जुंपली आहे.

    follow whatsapp