लक्ष्मीकांत बेर्डेंची मुलगी स्वानंदीचं अभिनयक्षेत्रात पदार्पण

धनंजय माने इथेच राहतात या नाटकाद्वारे स्वानंदी लक्ष्मीकांत बेर्डे अभिनयक्षेत्रात पदार्पण करतेय़. हे नाटक मार्च महिन्यात रंगभूमीवर येत आहे. या नाटकाचं दिग्दर्शन राजेश देशपांडे करत असून, या नाटकात स्वानंदीसोबतच तीची आई आणि प्रसिद्धी अभिनेत्री प्रिया बेर्डेही या नाटकात प्रमुख भूमिकेत आहे. नुकताच या नाटकाचा बोरिवलीतील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात मुहर्त झाला. या नाटकाच्या तालमी आता जोरदार […]

मुंबई तक

15 Feb 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:46 PM)

follow google news

धनंजय माने इथेच राहतात या नाटकाद्वारे स्वानंदी लक्ष्मीकांत बेर्डे अभिनयक्षेत्रात पदार्पण करतेय़. हे नाटक मार्च महिन्यात रंगभूमीवर येत आहे. या नाटकाचं दिग्दर्शन राजेश देशपांडे करत असून, या नाटकात स्वानंदीसोबतच तीची आई आणि प्रसिद्धी अभिनेत्री प्रिया बेर्डेही या नाटकात प्रमुख भूमिकेत आहे. नुकताच या नाटकाचा बोरिवलीतील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात मुहर्त झाला. या नाटकाच्या तालमी आता जोरदार सुरू असून. बेर्डे घराण्यातील पुढच्या पिढीची स्वानंदी बेर्डे रंगभूमीवर दिमाखात पदार्पण करण्यासाठी आता सज्ज झाली आहे. मुंबई तकने स्वानंदी बेर्डेशी केलेली ही विशेष बातचीत…

    follow whatsapp