गणेशोत्सवासाठी कोकणात जाताय? पाहा मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडीची स्थिती

गणरायाच्या आगमनासाठी कोकणात जाणारे भक्त मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडीमुळे अडचणीत.

मुंबई तक

06 Sep 2024 (अपडेटेड: 06 Sep 2024, 07:34 PM)

follow google news

Konkan Ganeshotsav : लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी कोकणातील आपल्या घरी निघालेल्या चाकरमानी गणेशभक्तांचे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर अक्षरशः हाल पहायला मिळाले. गणेशोत्सवापूर्वी रस्ता सुस्थितीत होईल असे आश्वासन देणाऱ्या सरकारने कोकण वासियांना तासनतास रस्त्यावरतीच उभे केल्याने संताप व्यक्त होत आहे. मागील चौदा वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर यंदाही वाहतूक कोंडीचे विघ्न निर्माण झाले. नागोठणे, सुकेलीखिंड, कोलाड, इंदापूर, माणगाव, लोणेरे आणि टेमपाले या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. अवजड वाहनांची वाहतूक पूर्ण पणे बंद करण्याचे आदेश राज्य सरकार ने दिल्या नंतरही या मार्गावरून अवजड वाहतूक सुरूच आहे. त्याचाही फटका बसत आहे.

    follow whatsapp