Uddhav Thackeray : ‘राहुल नार्वेकरांकडे पोपट मेलाय हे जाहीर करण्याचं काम’ | Supreme Court Shiv Sena

Uddhav Thackeray on rahul narvekar Supreme Court Shiv Sena

मुंबई तक

12 May 2023 (अपडेटेड: 20 Jul 2023, 07:57 AM)

follow google news

सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) घटनापीठाने गुरुवारी (11 मे) उद्धव ठाकरे गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या विविध याचिका 7 जणांच्या घटनापीठाकडे पाठवलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात वर्षभरापासून सुरू असलेली राजकीय उलथापालथ काही काळासाठी थांबली असली तरी सर्वोच्च न्यायालयाने राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांवर भाष्य करताना त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच, सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे गेले नाही, त्यामुळे त्यांचे सरकार पुनर्स्थापित करता येणार नाही. याच सगळ्या घडामोडींवर उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर पत्रकार परिषद घेऊन भाष्य केलं.

Uddhav Thackeray, rahul narvekar, Supreme Court Shiv Sena,

    follow whatsapp