एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली झालेली बंडखोरी. शिवसेनेचं निवडणूक चिन्ह आणि पक्ष हायजॅक करण्याचा शिंदे गटाकडून होत असलेला प्रयत्न आणि शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून सुरू झालेला सुप्त संघर्ष या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी आज नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेचे बाण डागले. मुंबई महापालिका निवडणुकीसह विविध मुद्द्यांवरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिंदे गट आणि राज्य-केंद्रातील भाजप सरकार निशाणा साधला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
