महाराष्ट्रातील सरकारने महिलांसाठी 'मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना' आणली आहे आणि तरुणांसाठी विविध योजना आहेत. परंतु, शालेय विद्यार्थ्यांसाठी कोणतीही योजना नाही. या पार्श्वभूमीवर, पुण्यातील राजगुरुनगर येथे एका शालेय मुलाने गणपती बाप्पांसमोर अनोखी मागणी केली आहे. नवयुग मित्र मंडळाच्या वतीने आयोजित गुणवत्तादर्शन कार्यक्रमात सहभागी झालेल्या या मुलाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजोबांना 'मुख्यमंत्री लाडका नातू योजना' आणून प्रत्येक विषयात 15-15 गुण वाढवून देण्याची विनंती केली आहे. या तीन मिनिटांच्या भावुक भाषणामुळे अनेकांची मने जिंकली आहेत. ही घटना सध्या चर्चेत आहे आणि तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
