‘देवेंद्रजी, आमच्या कानात सांगा. सरकार कधी येणार. आम्ही कुणाला सांगणार नाही. या चर्चा आता बंद करा,’ असं सांगत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजप नेते, कार्यकर्त्यांना चार युक्तीच्या गोष्टी सांगितल्या. भाजप प्रदेश कार्यकारिणीची बैठक मंगळवारी मुंबईत सुरू झाली. यावेळी प्रास्ताविक करताना चंद्रकांत पाटील यांनी विरोधी पक्ष म्हणून काम करा, असा रोखठोक सल्ला. यावेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
