Kolhapur Band Protest वेळी नेमकं काय घडलं?| Kolhapur Aurangzeb Status| Kolhapur News | Eknath Shinde

what happened Kolhapur Band Protest, Kolhapur Aurangzeb Status

मुंबई तक

07 Jun 2023 (अपडेटेड: 20 Jul 2023, 10:05 AM)

follow google news

औरंगजेबाचे स्टेटस ठेवल्यावरून कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी संघटना रस्त्यावर उतरल्या. त्यानंतर मंगळवारपासून कोल्हापुरात दगडफेक आणि लाठीचार्जमुळे तणावपूर्ण परिस्थिती आहे. कोल्हापूरमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी राज्य सरकारकडे अंगुली निर्देश केला आहे. “शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करणे ही राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे. पण जर राज्य सरकारच या प्रकरणात लोकांना उचकवू लागले आणि दोन समाजात, दोन जातींमध्ये कटुता निर्माण करू लागले तर हे काही चांगले लक्षण नाही”, असं पवारांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शांतता राखण्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे.

what happened Kolhapur Band Protest, Kolhapur Aurangzeb Status

    follow whatsapp