हिंदू की मुस्लिम वादातच एनसीबी अधिकारी समीर वानखेडे सोमवारी चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी गेले. वानखेडे चैत्यभूमीवर पोचले, तेव्हा काहीसं गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. समीर वानखेडेंविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. भीमशक्ती रिपब्लिकन सेनेनं वानखेडेंना चैत्यभूमीवर येण्याचा नैतिक अधिकार नसल्याचा दावा केला. यावेळी समीर वानखेडेंना तुम्ही बौद्ध आहात, असं जाहीर करा, अशा पद्धतीचं आव्हान देण्यात आलं. त्यावर वानखेडे होय मी बौद्ध आहे, असं म्हणाले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
