ST Employee Strike : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन मागे घेतलं. कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात साडे सहा हजार रुपयांची वाढ आणि बडतर्फ झालेल्या कामगारांना पुन्हा सेवेत सामील करण्याची मागणी देखील मान्य करण्यात आलीय. परंतु यावेळच्या कामबंद आंदोलनात एसटी महामंडळाच्या सरकारमधील विलिनीकरणावर कोणतीही चर्चा झालेली नाही. परंतु आता बंद मागे घेण्याच्या श्रेयासाठी नेत्यांमध्ये सुप्त संघर्ष सुरू झाला आहे. सहा प्रमुख दावेदारांमध्ये गुंता सुरू आहे. एकत्रित चर्चा आणि मागण्या मान्य झाल्यानंतर संप मागे घेण्याचे हे मोठ्या महत्त्वाचे पाऊल ठरले आहे. राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे तर नेत्यांमध्ये श्रेय घेण्यासाठी स्पर्धा लागली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
