पंजाबराव देशमुख यांनी विदर्भातल्या मराठ्यांना कसं मिळवून दिलं OBC आरक्षण?

मुंबई तक

11 Apr 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:06 PM)

26 नोव्हेंबर 1927 हा विदर्भाच्या इतिहासातला अभूतपूर्व, ऐतिहासिक असा दिवस. याच दिवशी विदर्भात अभूतपूर्व गोष्ट घडली. मराठ्यांच्या इतिहासातला अशा पद्धतीनं झालेला हा पहिला विवाह होता, असा करतात. नवरा मुलगा होता खानदानी मराठा कुटुंबातला पंजाबराव देशमुख. तर नवरी मुलगी होती सोनार समाजातली विमलबाई वैद्य. प्रार्थना समाजाचे पुढारी जयराम वैद्य यांची ही मुलगी होती. विदर्भातला हा पहिला […]

follow google news

26 नोव्हेंबर 1927 हा विदर्भाच्या इतिहासातला अभूतपूर्व, ऐतिहासिक असा दिवस. याच दिवशी विदर्भात अभूतपूर्व गोष्ट घडली. मराठ्यांच्या इतिहासातला अशा पद्धतीनं झालेला हा पहिला विवाह होता, असा करतात. नवरा मुलगा होता खानदानी मराठा कुटुंबातला पंजाबराव देशमुख. तर नवरी मुलगी होती सोनार समाजातली विमलबाई वैद्य. प्रार्थना समाजाचे पुढारी जयराम वैद्य यांची ही मुलगी होती. विदर्भातला हा पहिला आंतरजातीय विवाह म्हटला जातो. शंभर वर्षांपूर्वी क्रांतीकारक पाऊल उचलणारा हाच मुलगा पुढे देशाचा पहिला कृषीमंत्री झाला. विदर्भात शिक्षणाची गंगा आणली. देशातल्या पहिल्या हरित क्रांतीची बीजं रोवली. पाटीलकी, देशमुखीत रमलेल्या मराठ्यांना कुणब्याचं आरक्षण मिळवून दिलं. आज आपण अस्सल मराठे या आपल्या विशेष सिरीजमध्ये याच बोलके नाही तर कर्ते समाजसुधारक, राजकारणी असलेल्या पंजाबरावांची गोष्ट काही किशांमधून उलगडणार आहोत.

    follow whatsapp