Chitra Wagh: संजय राठोड प्रकरणात चित्रा वाघ यांनी माघार घेतली का?

Chitra Wagh Sanjay Rathod : शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्याविरोधातील याचिका मागे घेण्याची भूमिका चित्रा वाघांनी घेतली आहे. या प्रकरणात चित्रा वाघ यांच्या भूमिकेत बदल झाला आहे का, यावर चर्चा सुरू आहे.

मुंबई तक

10 Aug 2024 (अपडेटेड: 10 Aug 2024, 06:16 PM)

follow google news

Chitra Wagh vs Sanjay Rathod : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी  शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्याविरोधातील लढ्यातून माघार घेतली. कोर्टानं केस निकाली काढावी नाहीतर, माझे अशील केस परत घेतील, अशी भूमिका चित्रा वाघ यांच्या वकिलांनी कोर्टात न्यायाधिशांसमोर मांडली. परिस्थिती बदलली की तुमची भूमिका बदलते, कोर्ट राजकारण करण्याचा मार्ग नाही, तुमची भूमिका काय ते स्पष्ट करावं लागेल, असं कोर्टानं, चित्रा वाघ यांच्या वकिलांना खडसावलं. त्यानंतर माध्यमांसमोर येत चित्रा वाघ यांनी बाजू मांडली आहे. मंत्री संजय राठोड यांच्या वादग्रस्त प्रकरणात भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या भूमिकेत बदल झाला की नाही, यावर मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. कोर्टात सुनावणीदरम्यान वाघ यांच्या वकिलांनी माघारीचा इशारा दिला. राज्यातील राजकीय वर्तुळात या गोष्टीला वेगळेच वळण लागले असून अनेक शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. चित्रा वाघ यांनी माध्यमांसमोर येऊन आपली बाजू स्पष्ट केली आहे.

    follow whatsapp