महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना घराला एखाद्या छावणीचं स्वरूप आलंय. केंद्र सरकारची झेड प्लस सुरक्षा व्यवस्था असलेल्या सोमय्यांच्या घराबाहेर मुंबई पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केलाय. ठाकरे सरकारचे घोटाळे दाबण्यासाठीच सरकारकडून घराबाहेर पोलिस तैनात केल्याचा आरोप सोमय्या यांनी केलाय. किरीट सोमय्या हे सोमवारी 20 सप्टेंबरला कौल्हापूरला जाणार आहेत. पण कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस जारी करत सोमय्या यांना जिल्ह्यात येण्यास मनाई केलीय. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जिल्हाबंदी केलीय. खुद्द सोमय्या यांनीच ट्विट करून ही माहिती दिलीय.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
