आणि ठाकरेंच्या एका निर्णयाने रामदास कदम मावळते आमदार झाले…

महिना झालं, रामदास कदमांचं काय होणार, असा प्रश्न मीडियात, राजकीय वर्तुळात विचारला जातोय. अखेर उद्धव ठाकरेंनी कदमांचा निकाल लावला. हा निकाल मुख्यमंत्री म्हणून नाही, तर शिवसेना पक्षप्रमुख म्हणून लावलाय. विधान परिषद आमदार असलेल्या रामदास कदमांचं ठाकरेंनी तिकीट कापलं. आदित्य ठाकरेंच्या आमदारकीसाठी ‘वरळीचा त्याग’ करणाऱ्या सुनील शिंदेंना उमेदवारी दिलीय. तर अकोला-बुलडाणा-वाशिम मतदारसंघातून आमदार गोपिकिशन बिजोरिया यांची […]

मुंबई तक

20 Nov 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:30 PM)

follow google news

महिना झालं, रामदास कदमांचं काय होणार, असा प्रश्न मीडियात, राजकीय वर्तुळात विचारला जातोय. अखेर उद्धव ठाकरेंनी कदमांचा निकाल लावला. हा निकाल मुख्यमंत्री म्हणून नाही, तर शिवसेना पक्षप्रमुख म्हणून लावलाय. विधान परिषद आमदार असलेल्या रामदास कदमांचं ठाकरेंनी तिकीट कापलं. आदित्य ठाकरेंच्या आमदारकीसाठी ‘वरळीचा त्याग’ करणाऱ्या सुनील शिंदेंना उमेदवारी दिलीय. तर अकोला-बुलडाणा-वाशिम मतदारसंघातून आमदार गोपिकिशन बिजोरिया यांची उमेदवारी कायम ठेवलीय. या यादीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे, एकाचं तिकीट कापलं, तर दुसऱ्याचं कायम ठेवलंय. शिवसेना मंत्र्यांविरोधातच काम केल्याच्या आरोपामुळे वादात सापडलेल्या रामदास कदमांचा ठाकरेंनी निकाल लावला. ठाकरेंनी कदमाचा जो निकाल लावलाय, त्याचा अर्थ काय त्याचाच उलगडा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत.

    follow whatsapp