रामदेव बाबा यांच्या कोरोनिलला महाराष्ट्रात का एन्ट्री नाही?

रामदेव बाबा यांच्या पतंजली या आयुर्वेदिक उत्पादक कंपनीने बनवलेल्या कोरोनिल औषधावर महाराष्ट्रात बंदी घालण्यात आली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली. आपल्या ट्विटमध्ये अनिल देशमुख म्हणतात, पतंजलीच्या कोरोनिल औषधाच्या वैद्यकीय चाचणीवर IMA ने प्रश्न उपस्थित केले असून WHO ने सुद्धा हे औषध कोरोनावर परिणामकारक असल्याचा पतंजली आयुर्वेदचा चुकीचा दावा फेटाळला आहे. […]

मुंबई तक

25 Feb 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:45 PM)

follow google news

रामदेव बाबा यांच्या पतंजली या आयुर्वेदिक उत्पादक कंपनीने बनवलेल्या कोरोनिल औषधावर महाराष्ट्रात बंदी घालण्यात आली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली.

आपल्या ट्विटमध्ये अनिल देशमुख म्हणतात, पतंजलीच्या कोरोनिल औषधाच्या वैद्यकीय चाचणीवर IMA ने प्रश्न उपस्थित केले असून WHO ने सुद्धा हे औषध कोरोनावर परिणामकारक असल्याचा पतंजली आयुर्वेदचा चुकीचा दावा फेटाळला आहे. इतक्या घाईने हे औषध बाजारात आणणं आणि दोन ज्येष्ठ केंद्रीय मंत्र्यांनी याला समर्थन देणं योग्य नाही.

WHO, IMA व इतर संबंधित सक्षम आरोग्य संस्थांकडून योग्य प्रमाणीकरण झाल्याशिवाय पतंजलीच्या कोरोनिल औषध विक्रीस महाराष्ट्रात परवानगी दिली जाणार नाही.

    follow whatsapp