Sanjay Raut हे चंद्रकांत पाटील यांच्यावर 100 कोटींऐवजी सव्वा रुपयाचाच दावा का ठोकणार?

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एक पत्र लिहून शिवसेना आणि खासदार संजय राऊत यांच्यावर बरीच टीका केली आहे. त्यांचं हेच पत्र शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’त देखील छापण्यात आलं आहे. मात्र, यावेळी चंद्रकांत पाटलांनी जे आरोप केले आहेत ते दळभद्री आहेत. त्याविरोधात आपण ‘सव्वा रुपयांचा’ दावा ठोकणार आहोत. असं म्हणत संजय राऊतांनी चंद्रकांत पाटलांच्या आरोपांची खिल्ली […]

Privesh Pandey

22 Sep 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:37 PM)

follow google news

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एक पत्र लिहून शिवसेना आणि खासदार संजय राऊत यांच्यावर बरीच टीका केली आहे. त्यांचं हेच पत्र शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’त देखील छापण्यात आलं आहे. मात्र, यावेळी चंद्रकांत पाटलांनी जे आरोप केले आहेत ते दळभद्री आहेत. त्याविरोधात आपण ‘सव्वा रुपयांचा’ दावा ठोकणार आहोत. असं म्हणत संजय राऊतांनी चंद्रकांत पाटलांच्या आरोपांची खिल्ली उडवली आहे. संजय राऊत हे सध्या दिल्लीत असून तिथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना सामनातील चंद्रकांत पाटलांच्या पत्राबाबबत विचारणा केली त्यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटलांनी केलेल्या आरोपांबाबत स्पष्ट नाराजी व्यक्त केली.

    follow whatsapp