हर्षवर्धन पाटील शरद पवारांच्या पक्षात जाणार का?

अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेत दत्ता भरणे यांना उमेदवारी मिळणार असल्याचे संकेत दिल्याने हर्षवर्धन पाटील यांच्या अडचणी वाढल्यात. आता हर्षवर्धन पाटील काय निर्णय घेणार?

मुंबई तक

05 Sep 2024 (अपडेटेड: 05 Sep 2024, 10:38 AM)

follow google news

Harshwardhan Patil :  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील इंदापुरात नुकतीच जनसन्मान यात्रा घेतली. यावेळी त्यांनी दत्ता भरणे यांनी तालुक्यात केलेल्या कामांचा उल्लेख केला आणि आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी महायुतीकडून दत्ता भरणे यांनाच उमेदवारी दिली जाणार असल्याचे संकेत दिले. त्यामुळे भाजपचे इच्छूक उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्या राजकीय अडचणी वाढल्यात. नेमके हर्षवर्धन पाटील भाजपमध्येच राहणार की भाजपची साथ सोडून शरद पवारांच्या पक्षाची तुतारी हातात धरणार हे जाणून घेऊया हर्षवर्धन पाटील यांच्याकडून.

    follow whatsapp