उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत आणि सतेज पाटील यांचा हा प्रवासातला व्हिडिओ सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय ते सारथ्य करणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबल तृप्ती मुळीक यांच्यामुळे. कोल्हापुरातील अंबप पाडळी गावाच्या तृप्ती यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या अजित पवारांच्या गाडीचं स्टेअरिंग हाती घेतलं आणि खुद्द राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनाच सुरक्षितपणे पोहोचवण्याची जबाबदारी लिलया पेलली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
