महाराष्ट्र भूषण सोहळ्यात राजकीय स्वार्थ होता.. दुर्घटनेनंतर राज ठाकरेंची थेट प्रतिक्रिया

मुंबई तक

17 Apr 2023 (अपडेटेड: 17 Apr 2023, 11:03 AM)

आप्पासाहेब धर्माधिकारी यांना राजभवनावर बोलून महाराष्ट्र भूषण देता आला असता आणि राज्य सरकारला हा प्रसंग टाळता आला असता. तसेच राजकीय स्वार्थाशिवाय एवढी लोक बोलून जातात का,असे म्हणत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर केली होती.

maharahstra bhushan award mns raj thackeray react on incident

maharahstra bhushan award mns raj thackeray react on incident

follow google news

Raj Thackeray on Maharashtra Bhushan incident : नवी मुंबईच्या खारघरमध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र भूषण (Maharashtra Bhushan) पुरस्काराच्या कार्यक्रमात उपस्थित राहिलेल्या 12 जणांचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडलीय. या घटनेने महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरून विरोधकांनी शिंदे-फडणवीसांना घेरण्याचा प्रयत्न सूरू केला असतानाच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी प्रतिक्रिया समोर आली आहे.आप्पासाहेब धर्माधिकारी यांना राजभवनावर बोलावून पुरस्कार देत हा प्रंसग टाळता आला असता, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.(maharahstra bhushan award mns raj thackeray react on incident)

हे वाचलं का?

महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात जे श्री सदस्य जखमी झाले होते त्यांची भेट घेण्यासाठी राज ठाकरे (Raj Thackeray) रुग्णालयात पोहोचले होते. यावेळी त्यांनी रूग्णांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. सकाळी या गोष्टी करायची आवश्यकता नव्हती.आप्पासाहेब धर्माधिकारी यांना राजभवनावर बोलून महाराष्ट्र भूषण देता आला असता आणि राज्य सरकारला हा प्रसंग टाळता आला असता. तसेच राजकीय स्वार्थाशिवाय एवढी लोक बोलून जातात का,असे म्हणत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर केली होती.

सध्या सर्वच ठिकाणी वातावरण उन्हाने तापले आहे. अशावेळी सकाळी इतक्या लोकांना तुम्ही बोलावून कार्यक्रम करायची आवश्यकता नव्हती. जी घटना घडलीय ती दुदैवी असल्याचेही मत त्यांनी मांडलेय. या प्रकरणात कसे कोणाला जबाबदार धरता येईल ते सांगता येत नाही, तसेच हे जाणूनबुजून देखील केले जात नाही. एवढ्या लोकांना बोलावणे ही चांगली कल्पना नव्हती, हा पुरस्कार राज्यपालांच्या घरी देता आला असता असे मला वाटते, असेही राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले आहेत.

ट्विटरवरूनही सरकारवर ओढले ताषेरे

आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. ही अतिशय आनंदाची बाब आहे. पण या सोहळ्याला जे गालबोट लागलं ते टाळता आलं नसतं का ? कधी नव्हे त्या मुंबईत उष्माघाताच्या बातम्या वाचायला मिळतायत, इतक्या कडाक्याच्या उन्हात हा कार्यक्रम न करता त्याची वेळ संध्याकाळची असावी हे प्रशासनाला कळालं नाही का? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. सरकारने जरी मृतांच्या नातेवाईकांना मदतीची घोषणा केली असली तरी इतक्यावर न थांबता अशा दुर्दैवी घटना पुन्हा होणार नाहीत आणि प्रशासन अशा चुका करणार नाही ह्याची काळजी घ्यावी,असा सल्ला देखील दिला.

    follow whatsapp