Maharashtra Assembly Election 2024 LIVE News and Updates in Marathi : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. सर्वच राजकीय पक्षांनी बहुतांश उमेदवार जाहीर केले आहेत. उमेदवारी न मिळाल्याने काही नेत्यांनी थेट बंडखोरी केली आहे. या बंडोबांना आता शांत करण्याच राजकीय पक्षांसमोर आव्हान आहे. महाविकास आघाडीत काँग्रेसने 102, शरद पवार गटाने 83 आणि उद्धव ठाकरे गटाने 84 उमेदवारांची घोषणा केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपूत्र अमित ठाकरे यांनी सोमवारी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.
अशाच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, विधानसभेसंदर्भातील सर्व अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर...
लाइव्हब्लॉग बंद
ADVERTISEMENT
- 02:52 PM • 29 Oct 2024Maharashtra Assembly Election 2024 LIVE : अभिजीत बिचुकले बारामतीच्या रिंगणात
अभिजीत बिचकुले यांनी बारामतीच्या रिंगणात उडी घेतली आहे. त्याने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पवार विरुद्ध पवार लढाईमध्ये अभिजीत बिचकुले याने उडी घेतली आहे.
- 02:29 PM • 29 Oct 2024Maharashtra Assembly Election 2024 LIVE : नवाब मलिकांनी खरंच दोन अर्ज दाखल केले? 3 वाजता पत्रकार परिषदेतून सगळंच सांगणार
नवाब मलिक शिवाजीनगर-मानखूर्दमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी अपक्ष आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून अर्ज दाखल केला असल्याची माहिती आहे. यावर ते 3 वाजता माध्यमांशी संवाद साधणार आहेत.
- 02:28 PM • 29 Oct 2024देवेंद्र फडणवीसांच्या आदेशानंतर लखन मलिक यांची नाराजी दूर
वाशिम विधानसभा मतदारसंघात भाजप आमदार लखन मलिक उमेदवारी न मिळाल्याने नाराज झाले होते. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी शब्द आणि आदेश दिल्यानंतर आज कारंजा मतदारसंघातील उमेदवार सईताई डहाके यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी हजेरी लावली
- 01:13 PM • 29 Oct 2024Maharashtra Assembly Election 2024 LIVE : भाजपची चौथी यादी जाहीर, मीरा भाईंदरमध्ये कोणाला मिळाली संधी ?
भाजपची चौथी यादी जाहीर झाली आहे. मीरा भाईंदर याठिकाणी अपक्ष आमदार गीता जैन यांना संधी नाहीच. भारतीय जनता पक्षाकडून माजी आमदार नरेंद्र मेहता यांना उमेदवारी घोषित झाली आहे. तर उमरेड मधून सुधीर पारवेंच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
- 11:20 AM • 29 Oct 2024Maharashtra Assembly Election 2024 LIVE : काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र गावित आपला उमेदवारी अर्ज आज भरणार!
मोठं शक्ती प्रदर्शन करत राजेंद्र गावित उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. शहादा तळोदा मतदारसंघासाठी राजेंद्र गावित यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे. राजेंद्र गावित यांच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये खडा जंगी रंगली आहे.
- 09:49 AM • 29 Oct 2024Maharashtra Assembly Election 2024 LIVE : भावना गवळी उमेदवारी अर्ज दाखल करणार
रिसोड विधानसभा मतदार संघासाठी महायुतीच्या उमेदवार भावना गवळी तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार अमित झनक उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. वाशिम विधानसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार श्याम खोडे हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. कारंजा विधानसभा मतदार संघासाठी महायुती च्या उमेदवार सई डहाके आणि महाविकास आघाडी कडून ज्ञायक पाटणी हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. वाशिम जिल्ह्यातील तिन्ही मतदार संघात महायुती आणि महाविकास आघाडी चे बंडखोर तसेच काही अपक्ष उमेदवारी दाखल करणार आहेत. - 09:49 AM • 29 Oct 2024Maharashtra Assembly Election 2024 LIVE : मुंबईत महायुतीत तीन ठिकाणी बंडखोर उमेदवार
मुंबादेवी इथून शायना एनसीविरोधात भाजपचेच अतूल शाह यांची बंडखोरी. आज भरणार अपक्ष नामांकन अर्ज. बांद्रा पूर्व इथे शिवसेनेचे विभाग प्रमुख कुणाल सरमळकर अपक्ष रिंगणात उतरणार. आज सकाळी 9.30 वाजता भरणार उमेदवारी अर्ज. जिशान सिद्दीकी समोर शिवसेनेचे कुणाल सरमळकर रिंगणात उतरणार. मातोश्रीच्या अंगणात तिरंगी लढत. मानखुर्द अणूशक्तीनगर इथे एनसीपीच्या सना मलिक विरोधात भाजपचे माजी नगरसेवक बबलू पांचाल यांची बंडखोरी. आज करणार शक्ती प्रदर्शन.
- 09:48 AM • 29 Oct 2024Maharashtra Assembly Election 2024 LIVE : महायुतीने आतापर्यंत किती जागांवर उमेदवार उभे केलेत?
भाजपने आतापर्यंत 150 जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. अजित पवार गटाने 51 जागांवर आणि शिंदे गटाने 80 जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. 288 पैकी महायुतीने 281 जागांवर उमेदवार जाहीर केलेत. सात जागांवर उमेदवारी जाहीर करणं अजून बाकी आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
