Maharashtra breaking news in marathi : मुंबईत आज शिवसेनेचे दोन दसरा मेळावा होणार आहेत. शिवसेना ठाकरे गटाचा शिवाजी पार्कवर दसरा मेळावा होत आहे. शिवसेना शिंदे गटाचा आझाद मैदानावर दसरा मेळावा पार पडणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही दसरा मेळाव्याला महत्व आहे. आझाद मैदानावर शिवसेना शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
तसेच, आज दसऱ्याच्या निमित्त पंढरपुरात उत्साहाचं वातावरण आहे. विठ्ठल- रुक्मिणीमातेच्या मंदिरात झेंडूच्या फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
अशाच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, विधानसभेसंदर्भातील सर्व अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर...
लाइव्हब्लॉग बंद
ADVERTISEMENT
- 05:43 PM • 12 Oct 2024शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात CM शिंदे, उद्धव ठाकरे काय बोलणार?
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात जोरदार सामना रंगणार आहे. तत्पूर्वी दसरा मेळाव्यात शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाची तोफ धडाडणार आहे. आज दसऱ्याच्या निमित्ताने शिवाजी पार्कमध्ये उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आझाद मैदानात शिवसैनिकांना संबोधीत करणार आहेत.
- 03:01 PM • 12 Oct 2024मुंडेसाहेबांनी तुमची जबाबदारी मला दिलीये- पंकजा मुंडे
दसरा मेळाव्यात बोलताना पंकजा मुंडे यांनी म्हटले की, मुंडेसाहेबांनी तुमची जबाबदारी मला दिलीये, मी कोणालाही घाबरत नाही.
- 02:33 PM • 12 Oct 2024Maharashtra News : बारा वर्षाच्या तपानंतर मी इथे आलोय- धनंजय मुंडे
मी आज भारावून गेलोय, बारा वर्षाच्या तपानंतर मी इथे आलोय. पवित्र दसरा मेळाव्याची आगळी वेगळी परंपरा आहे. मुंडे साहेबांनी शेवटच्या श्वासापर्यंत सुरू ठेवली त्यानंतर भगिनी पंकजा मुंडे यांनी सुरू ठेवली. याचा मला अभिमान आहे, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले.
- 01:48 PM • 12 Oct 2024Maharashtra News : आता दाखवतो यांना कचका- मनोज जरांगे
आता मग दाखवतो यांना कचका... नाटकं करतात व्हय. करोडोच्या संख्येने समुदाय न्यायासाठी लढत आहे. जो समुदाय न्यायासाठी लढतोय त्यांच्या बाजूने न्याय करणारे लोकं नाहीत, असे मनोज जरांगे यांनी म्हटले.
- 01:47 PM • 12 Oct 2024Maharashtra News : मराठा समाजवर संस्कार- मनोज जरांगे
मराठा समाजवर संस्कार आहेत. ते संस्कार कधीच जातीवाद करत नाहीत. प्रचंड ताकदीने असणारा हा समुदाय आहे. या राज्यावर समुद्रासारखा पसरला आहे. पण कधीच मस्तीत आणि मग्रुरीत हा समाज वागत नाही.
- 12:39 PM • 12 Oct 2024Maharashtra News : मनोज जरांगे पाटील आज नारायण गडावरून कोणावर साधणार निशाणा?
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे नारायण गडावरुन कुणावर निशाणा साधणार हे थोड्याच वेळात समोर येईल. मराठा आंदोलनाचा मुद्दा अजूनही कायम आहे. ओबीसी प्रवर्गातून समाजाला आरक्षण देण्याची त्यांची मागणी आहे. ते काय बोलतात याकडे राजकीय नेत्यांचे पण लक्ष आहे.
- 12:37 PM • 12 Oct 2024Maharashtra News : महाविकास आघाडीची उद्या दुपारी महत्वाची पत्रकार परिषद
महाविकास आघाडीची उद्या दुपारी महत्वाची पत्रकार परिषद होणार आहे. जागावाटपासंदर्भात उद्या महत्वाची घोषणा होऊ शकते. या पत्रकार परिषदेसाठी शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले हे उपस्थित राहणार आहेत.
- 12:36 PM • 12 Oct 2024बाळासाहेब थोरात हे स्वप्नात आहेत आणि त्यांचे स्वप्न लवकरच भंग होईल- खासदार सुजय विखे पाटील
बाळासाहेब थोरात हे स्वप्नात आहेत आणि त्यांचे स्वप्न लवकरच भंग होईल, अशी टीका माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी केली. जातीपातीच्या राजकारणामुळे लोकसभेला माझा पराभव झाला आहे. मागासवर्गीय समाज, हिंदू मुस्लिम यांच्या मनात भिती निर्माण केली त्यामुळे माझा पराभव झाला.
- 10:28 AM • 12 Oct 2024Maharashtra News : दुर्बलता हा अपराध, मोहन भागवत यांचे हिंदूंना मोठे आवाहन
दुर्बलता हा अपराध आहे, हे हिंदूंनी लवकरात लवकर समजून घ्यावे. जगात अशा काही घटना घडत आहेत. त्यात ही दुर्बलता हिंदूंसाठी घातक असल्याचे राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्पष्ट केले.
- 10:11 AM • 12 Oct 2024Maharashtra News : विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात झेंडूच्या फुलांची आकर्षक सजावट
आज दसऱ्याच्या निमित्त पंढरपुरात उत्साहाचं वातावरण आहे. विठ्ठल- रुक्मिणीमातेच्या मंदिरात झेंडूच्या फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. ही सजावट पुण्यातील विठ्ठल भक्त राम जांभूळकर यांनी केली आहे. विठ्ठल आणि रुक्मिणीमातेचा गाभारा तसंच मंदिराच्या इतर भागांना केसरी- पिवळ्या झेंडूच्या फुलांनी सजवण्यात आला आहे. त्यामुळे विठ्ठल आणि रुक्मिणीमातेचे रुप अधिकच खुलुन दिसत आहे.
- 10:07 AM • 12 Oct 2024Maharashtra News: मनोज जरांगे यांच्या उपस्थितीत आज दसरा मेळावा
बीड जिल्ह्यातील नारायण गडावर होणार दसरा मेळावा.. राज्यभरातून दसरा मेळाव्यासाठी मराठा समाज नारायण गडावर येणार.. दुपारी बारा वाजता नारायण गडावरून मनोज जरांगे पाटील यांच्या भाषणाला सुरुवात.. जरांगे पाटील आज सरकार आणि विरोधी पक्षावर काय निशाण साधतात यावर सर्वांचे लक्ष…
- 10:07 AM • 12 Oct 2024Maharashtra News : नुसते रस्ते बांधणे आणि उड्डाणपूल बांधणे ही प्रगती नाही- राज ठाकरे
"दरवर्षी तुम्ही बेसावध राहतात आणि हे राजकीय पक्ष आपापले खेळ करत राहतात. या सगळ्यात महाराष्ट्राची प्रगती कुठे चालली आहे? नुसते रस्ते बांधणे आणि उड्डाणपूल बांधणे ही प्रगती नसते. आमच्या हातात मोबाईल आले कलर टीव्ही आले, तुमची गॅजेट्स म्हणजे प्रगती नव्हे. प्रगती समाजाची व्हावी लागते. अजूनही आपण चाचपडतच आहोत. पण, इतक्या वर्षांच्या तुम्हाला प्रगतीच्या थापा मारून देखील तुमच्यातला राग व्यक्त होताना मला दिसत नाही. त्याच लोकांना दरवेळेस निवडून देतात आणि नंतर पश्चातापाचा हात कपाळावर मारत राहायचा आणि नंतर पाच वर्षा बोंब मारायची." दसऱ्यानिमित्त राज ठाकरेंचा पॉडकास्ट प्रसारित करण्यात आला. यातून राज ठाकरेंनी जनतेशी संवाद साधला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
