live blog active
लाइव्ह

Maharashtra Nagar Parishad and Nagar Panchayat Election Result Live: नगरपालिका आणि नगरपरिषदेच्या निवडणूकीत कोणी मारली बाजी? प्रत्येक क्षणाचे लाईव्ह अपडेट्स एकाच क्लिकवर

Maharashtra Nagar Parishad and Nagar Panchayat Election Result Live Updates 2025: स्थानिक स्वराज्य संस्थांमधील 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींसाठी डिसेंबर 2025 मध्ये निवडणुका घेण्यात आल्या. ज्याचा निकाल आज (21 डिसेंबर) या मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल. 

maharashtra nagar parishad and nagar panchayat election result live updates 2025 bjp shiv sena ncp shiv sena ubt ncp sharad pawar

नगर परिषद निवडणूक निकालाचे LIVE अपडेट

मुंबई तक

21 Dec 2025 (अपडेटेड: 21 Dec 2025, 11:44 AM)

follow google news

मुंबई: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. ज्याची मतमोजणी आज (21 डिसेंबर) होणार आहे. त्यानंतर निकाल जाहीर करण्यात येईल. मागील 5 वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या होत्या. त्यामुळे आतापर्यंत टप्प्याटप्प्याने घेतल्या जाणाऱ्या नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या निवडणुका या यंदा एकच वेळी घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे या निकालांकडे मिनी विधानसभा निवडणुका देखील म्हणून पाहिल्या जात आहेत. या निवडणुकांमध्ये राज्यात कोणत्या पक्षाचं वर्चस्व असेल हे देखील सिद्ध होणार आहे. त्यामुळेच प्रत्येक जिल्ह्यातील नगर परिषदा आणि नगर पंचायतींचे निकालाचे क्षणाक्षणाचे अपडेट आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. (Maharashtra Nagar Parishad Results LIVE Updates)

  • 03:32 PM • 21 Dec 2025
    Maharashtra Local Body Election Results 2025 LIVE: गोंदिया नगर परिषदेचे काँग्रेसचे उमेदवार सचिन शेंडे यांचा विजय

    गोंदिया नगरपरिषदेचे काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सचिन शेंडे यांचा विजय झाला आहे. 
     

    भाजप - 17
    काँग्रेस - 15
    ठाकरे गट - 02
    राष्ट्रवादी अजित पवार - 05
    बसपा - 02
    अपक्ष - 03

  • 03:30 PM • 21 Dec 2025
    LIVE Nagar Panchayat Results 2025: उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचा बीड नगरपरिषदेत मोठा विजय

    राष्ट्रवादी पक्षाच्या प्रेमलता पारवे यांचा बीड नगरपरिषदेत विजय झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने बीड मधील गड राखला. बीड नगरपालिकेत भाजपाचा निसटता पराभव झाला असून विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांना देखील धक्का बसला आहे. 
     

  • 03:27 PM • 21 Dec 2025
    Maharashtra Local Body Election LIVE Updates: नागपूर जिल्ह्यात कॅाग्रेस नेते सुनील केदार यांना मोठा धक्का

    सुनील केदार यांच्या सावनेर या मुळ गावात भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार संजना मंगळे विजयी झाल्या असून काँग्रेस नेते सुनील केदार यांना यामुळे मोठा धक्का बसला आहे. सावनेरमध्ये भाजपचे 23 पैकी 21 नगरसेवक आणि स्थानिक आघाडीचे दोन नगरसेवक निवडून आल्याचं वृत्त आहे. 
     

  • 03:23 PM • 21 Dec 2025
    Maharashtra Nagar Panchayat Results LIVE Updates: चाळीसगाव भाजप आमदार मंगेश चव्हाण यांचे वर्चस्व कायम

    चाळीसगाव नगरपरिषदेत आमदार मंगेश चव्हाण यांच्या पत्नी भाजपच्या उमेदवार प्रतिभा चव्हाण विजयी झाल्याची माहिती समोर आली आहे. चाळीसगाव नगरपरिषदेवर भाजपने प्रचंड बहुमत मिळवत एक हाती सत्ता स्थापन केली आहे. सलग दुसऱ्यांदा चाळीसगाव नगरपरिषदेवर भाजपने झेंडा फडकवला आहे.

  • 03:18 PM • 21 Dec 2025
    Maharashtra Local Body Election LIVE Updates: पंढरपूर मध्ये भाजपला भालकेंचा झटका

    पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर प्रणिता भालके यांनी 11000 मतांनी भाजपचे उमेदवार शामल शिरसाठ यांचा पराभव केलेला आहे. यामुळे माजी आमदार प्रशांत परिचारक आणि भाजपचे आमदार समाधान आवताडे यांना मोठा धक्का मानला जात आहे
     

  • 03:14 PM • 21 Dec 2025
    Maharashtra Local Body Election Results 2025 LIVE: भंडारा जिल्ह्यातील नगर परिषदेची मोठी अपडेट

    भंडारा जिल्ह्यातील साकोली नगरपालिका नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार भाजपच्या देवश्री कापगते 2600 मतांनी विजयी झाल्याची माहिती आहे. तसेच, पवनी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) विजया नंदुरकर 577 मतांनी विजयी झाल्या आहेत. तुमसर नगरपालिकेचे नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार सागर गभणे 1045 मतांनी विजयी झाले आहेत. 

  • 03:11 PM • 21 Dec 2025
    Maharashtra Local Body Election LIVE Updates: कराड नगरपालिका अंतिम निकाल

    कराड नगरपालिका अंतिम निकाल 

    राजेंद्रसिंह यादव- 24,096
    भाजपचे विनायक पावसकर - 14,361

    शिवसेना राजेंद्रसिंह यादव यांचा 9 हजार 735 मतांनी विजय

  • 03:02 PM • 21 Dec 2025
    Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 LIVE: सिन्नरमध्ये विठ्ठलराजे उगले 5,602 मतांनी विजयी

    राजकीयदृष्ट्या अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या सिन्नर नगरपरिषद निवडणुकीत आमदार माणिकराव कोकाटे यांच्या समर्थकाने दणदणीत विजय मिळवत आपले पुन्हा एकदा वर्चस्व गाजवले आहे. सध्या, मोठ्या अडचणींचा सामना करत असलेल्या कोकाटे यांना सिन्नरमधून मोठा दिलासा मिळाला असून त्यांचे खंदे समर्थक विठ्ठलराजे उगले यांनी सिन्नर नगरपरिषदेच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे.

  • 02:56 PM • 21 Dec 2025
    Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 LIVE: नांदेडच्या हदगाव नगरपालिकेत शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराचा विजय

    नांदेडच्या हदगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार रोहिणी वानखेडे या विजयी झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. 

  • 02:53 PM • 21 Dec 2025
    Maharashtra Nagar Panchayat Results LIVE Updates: भद्रावती नगरपालिकेत फक्त एकाच मताने निवडून आली भाजपची उमेदवार

    भद्रावती नगरपालिकेत फक्त एका मताने भाजपची उमेदवार निवडून आल्याची बातमी समोर आली आहे. काँग्रेसच्या उमेदवाराला 707 तर भाजपच्या 708 मते मिळाल्याचं वृत्त आहे. विशेष म्हणजे भद्रावतीत भाजपचे फक्त दोनच नगरसेवक निवडून आले असून त्यापैकी एका उमेदवाराला फक्त एकमताने विजयी मिळाला. 
     

  • 02:50 PM • 21 Dec 2025
    Maharashtra Local Body Election Results 2025 LIVE: चंद्रपूर जिल्ह्यात नगराध्यक्ष पदांसाठी कोण आघाडीवर?

    चंद्रपूर जिल्ह्यात नगराध्यक्ष पदांसाठी कोण आघाडीवर? 

    • वरोरा नगराध्यक्ष  : काँग्रेसचे अर्चना ठाकरे आघाडीवर
    • मूल नगराध्यक्ष : एकता समर्थ, काँग्रेस विजयी 
    • राजुरा नगराध्यक्ष  - अरुण धोटे काँग्रेस, विजयी 
    • गडचांदूर नगराध्यक्ष  - निलेश  ताजने अपक्ष उमेदवार आघाडीवर
    • नागभीड नगराध्यक्ष कॅांग्रेस - सौ. स्मिता खापर्डे विजय
    • भद्रावती नगराध्यक्ष शिंदेसेना  - प्रफुल चटकी विजयी
    • घुग्गुस नगराध्यक्ष - काँग्रेस आघाडीवर -- सौ. दीप्ती सोनटक्के 
    • चिमूर पालिका भाजपा गीता लिंगायत उमेदवार आघाडीवर
    • बल्लारपूर नगराध्यक्ष- काँग्रेस उमेदवार सौ.अल्का वाढई आघाडीवर
    • ब्रह्मपुरी नगराध्यक्ष काँग्रेसचे उमेदवार योगेश मीसार विजयी
    • भिसी नगरपंचायत - भाजप पक्षाचे अतुल पारवे विजयी
  • 02:47 PM • 21 Dec 2025
    Maharashtra Nagar Panchayat Results LIVE Updates: रायगडच्या नगराध्यक्ष पदांबाबत मोठी अपडेट

    रायगडच्या नगराध्यक्ष पदांबाबत मोठी अपडेट 

    महाड - शिवसेना शिंदेगट 
    श्रीवर्धन - शिवसेना उबाठा
    रोहा - राष्ट्रवादी, अजित पवार गट.
    पेण - भाजप
    मुरुड - राष्ट्रवादी, अजित पवार गट.
    अलिबाग - शेकाप.
    खोपोली - शिवसेना शिंदे गट 
    कर्जत - राष्ट्रवादी. अजित पवार.
    माथेरान - शिवसेना, शिंदे गट 
    उरण - महाविकास आघाडी.


    शिवसेना शिंदे - 3
    उबाठा - 2
    राष्ट्रवादी अजित पवार 3
    शेकाप 1
    भाजपा 1

  • 02:45 PM • 21 Dec 2025
    Maharashtra Local Body Election Results 2025 LIVE: नाशिक जिल्ह्यातील नगराध्यक्षपदाचे विजयी झालेले उमेदवार

    पिंपळगाव बसवंत : डॉ. मनोज बर्डे – भाजप
    ओझर : अनिता घेगडमल – भाजप
    चांदवड : वैभव बागुल -भाजप
    इगतपुरी : शालिनी खातळे – शिंदे सेना
    नांदगाव : सागर हिरे – शिंदे सेना
    सटाणा : हर्षदा पाटील -शिंदे सेना
    त्र्यंबकेश्वर : त्रिवेणी तुंगार – शिंदे सेना
    मनमाड : योगेश पाटील – शिंदे सेना
    भगूर : प्रेरणा बलकवडे – राष्ट्रवादी अजित पवार
    येवला : राजेंद्र लोणारी – राष्ट्रवादी अजित पवार
    सिन्नर : विठ्ठल उगले – राष्ट्रवादी अजित पवार

  • 02:43 PM • 21 Dec 2025
    LIVE Nagar Panchayat Results 2025: कराडमध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजेंद्रसिंह यादव 8062 मतांनी विजयी

    नगराध्यक्ष पदाचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजेंद्रसिंह यादव 8062 मतांनी विजयी झाल्याची माहिती समोर आली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,  भाजप आमदार अतुल भोसले यांना हादरा बसला आहे. कराड नगराध्यक्ष पदाचे शिवसेना शिंदे गटाचे विजयी उमेदवार राजेंद्र सिंह यादव यांचं विजयानंतर औक्षण करण्यात आलं तर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून गुलाल उधळत आनंद व्यक्त केला त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सकलेन मुलाणी यांनी केली आहे
     

  • 02:41 PM • 21 Dec 2025
    Maharashtra Local Body Election Results 2025 LIVE: जालना जिल्ह्यातील नगरपरिषदेचा निकाल...

    जालना जिल्हा: एकूण नगर परिषदेच्या जागा - 3 

    भाजपा - 2
    राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट - 1

    भोकरदन नगर परिषद:

    विजयी उमेदवार - मिर्झा समरीन नाज वसीम बेग
    पक्ष - राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 

    अंबड नगर परिषद:

    विजयी उमेदवार - देवयानी केदार कुलकर्णी
    पक्ष - भाजपा 

    परतूर नगर परिषद:

    विजयी उमेदवार - प्रियंका शहाजी राक्षे
    पक्ष - भाजपा

  • 02:39 PM • 21 Dec 2025
    Maharashtra Local Body Election LIVE Updates: धाराशिव- भाजप व शिंदे गटाचे वर्चस्व, स्थानिक आघाड्यांचीही सरशी

    धाराशिव जिल्ह्यातील नगरपरिषदांच्या अध्यक्ष व सदस्य पदासाठी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीचे अंतिम निकाल जाहीर झाले असून जिल्ह्यात भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे वर्चस्व स्पष्टपणे दिसून आले आहे. काही ठिकाणी स्थानिक आघाड्यांनीही प्रभावी कामगिरी करत सत्ता मिळवली आहे. धाराशिव नगरपरिषदेत अध्यक्षपदाबाबत राजकीय हालचाली सुरू असताना, तुळजापूर, नळदुर्ग, मुरूम येथे भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. उमरगा, कळंब आणि परंडा येथे शिवसेना शिंदे गटाने सत्ता कायम राखली आहे. भूम नगरपरिषदेत मात्र राष्ट्रीय पक्षांना धक्का देत स्थानिक विकास आघाड्यांनी सत्ता हस्तगत केली आहे.
     

    नगरपरिषदनिहाय निकाल
     

    1. तुळजापूर : भाजपाचे विनोद गंगणे अध्यक्ष; भाजप 18, इतर 5 – एकूण 23 जागा
    2. नळदुर्ग : भाजपाचे बसवराज धरणे अध्यक्ष; भाजप 10, शिवसेना शिंदे 1, इतर 9 – एकूण 20
    3. उमरगा : शिवसेना शिंदे गटाचे किरण गायकवाड अध्यक्ष; शिंदे गट 12, भाजप 5, राष्ट्रवादी (शरद) 2, इतर 6 – एकूण 25
    4. मुरूम : भाजपाचे बापुराव पाटील अध्यक्ष; भाजप 19 – एकूण 20
    5. कळंब : शिवसेना शिंदे गटाच्या सुनंदा कापसे अध्यक्ष; शिंदे गट 4, भाजप 6, शिवसेना ठाकरे 9, इतर 1 – एकूण 20
    6. भूम : स्थानिक आघाड्यांची सत्ता; आलमप्रभू भूम शहर विकास आघाडी 6, जनशक्ती नगर विकास आघाडी 14 – एकूण 20
    7. परंडा : शिवसेना शिंदे गटाचे जाकीर सौदागर अध्यक्ष; शिंदे गट 8, इतर 12 – एकूण 20
  • 02:37 PM • 21 Dec 2025
    LIVE Nagar Panchayat Results 2025: भाजपाने एकाच घरातील सहा जणांना दिली होती उमेदवारी; नगरपालिकेत लोह्याच्या घराणेशाहीचा पराभव...

    नांदेड जिल्हातील लोहा नगर परिषदेच्या निवडणूकीत भारतीय जनता पार्टीने चक्क एकाच कुटुंबातील सहा जणांना उमेदवारी दिली होती. त्यामध्ये, नगराध्यक्ष पदासाठी भाजपने गजानन सूर्यवंशी यांना उमेदवारी दिली होती. तसेच नगरसेवक पदासाठी गजानन सूर्यवंशी यांच्या पत्नी गोदावरी सूर्यवंशी, भाऊ सचिन सूर्यवंशी, भावाची पत्नी सुप्रिया सचिन सूर्यवंशी, मेव्हुणा युवराज वाघमारे, भाच्याची पत्नी रीना अमोल व्यवहारे अशा सहा जणांना उमेदवारी दिली होती. पक्षात घराणेशाही चालत नाही म्हणणाऱ्या भाजपने एकाच घरातील सहा जणांना उमेदवारी दिल्याने चर्चेचा विषय बनला होता. ते स्वतःला महाराष्ट्राचे,जिल्ह्याचे नेते समजतात त्यांना उमेदवार मिळत नसतील तर काय करतील, एका घरात सहा नाही दहा उमेदवार देतील, शेवटी त्यांना पॅनल उभा करायचं आहे. उमेदवार किती आहेत हे महत्त्वाचं नाही.अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी अशोक चव्हाण आणि भाजपा वर केली होती.

  • 02:32 PM • 21 Dec 2025
    Maharashtra Local Body Election Results 2025 LIVE: रायगड नगरपालिका निकाल

    रायगड नगरपालिका निकाल  

    • रोहा - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष उमेदवार वनश्री शेडगे विजयी
    • मुरूड - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आराधना दांडेकर विजयी
    • कर्जत  - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पुष्पा दगडे विजयी
    • माथेरान  - शिवसेना पक्ष नगराध्यक्ष पदाचे उमेदवार चंद्रकांत चौधरी विजयी
    • खोपोली - शिवसेना पक्ष नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुलदीप शेंडे विजयी
    • महाड  - शिवसेना पक्ष नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुनील कविस्कर विजयी 
    • श्रीवर्धन  - उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अतुल चोगले विजयी
    • पेण - भाजप चे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. प्रितम पाटील विजयी
    • अलिबाग  - शेकाप चे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अक्षया नाईक विजयी
    • उरण - राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार भावना घाणेकर विजयी
  • 02:22 PM • 21 Dec 2025
    Maharashtra Local Body Election LIVE Updates: भाजपा नेते योगेश क्षीरसागर यांच्या पत्नी सारिका क्षीरसागर यांचा विजय

    बीड: भाजपा नेते योगेश क्षीरसागर यांच्या पत्नी सारिका क्षीरसागर यांचा प्रभाग क्रमांक 15 मधून विजय झाल्याची माहिती आहे. 15 व्या फेरी अखेर भाजपाच्या डॉ. ज्योती घुंबरे 9273 ने आघाडीवर असल्याचं वृत्त आहे. 
     

  • 02:19 PM • 21 Dec 2025
    Maharashtra Local Body Election Results 2025 LIVE: बारामती नगरपरिषदेत प्रभाग 14 मधून आरती शेंडगे विजयी..

    बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने खाते उघडलं आहे. प्रभाग क्रमांक 13 मधून आरती शेंडगे विजय झाल्या आहेत. खरंतर या निवडणुकीमध्ये शरद पवार पक्षाच्या वतीने युगेंद्र पवार यांनी स्वतः लक्ष घातलं होतं. त्यामुळे या निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाला खात उघडताना येणार की नाही याबाबत उत्सुकता होती. मात्र प्रति शेंडगे यांच्या रूपान राष्ट्रवादी शरद पवार गटाचा एक नगरसेवक बारामतीच्या नगरपालिकेत विराजमान होणार आहे. या निवडणुकीत बहुजन समाज पार्टी, राष्ट्रीय समाज पार्टी तसेच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवारांना खाते उघडले पण अजूनही खाते उघडता आलं नाही.
     

follow whatsapp